बांदा (प्रतिनिधी) - कोणतेही वादविवाद न करता शेतकऱ्यांना समजावून सांगून अनेक वर्षे बंद असलेले शेतपाणंद रस्ते खुले करणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. कास गावाने लोकसहभागातून आदर्श निर्माण केला आहे, असे गौरवोद्गार सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी काढले. कास गावातील मुख्यमंत्री शेतपाणंद रस्त्यांच्या कामांची पाहणी करताना त्यांनी सरपंच प्रवीण पंडित यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
यावेळी कास ग्राममहसूल अधिकारी सीमा कांबळे, कोतवाल विनोद धुरी, सरपंच प्रविण पंडित, ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ पंडित, ग्रामस्थ नारायण पंडित, अभिमन्यू कासकर, पांडुरंग पंडित, नामदेव पंडित, जयवंत पंडित, शशिकांत पंडित, शांताराम राणे, बाळकृष्ण पंडित, महादेव राणे, घनश्याम पंडित, काशीराम पंडित, अनिल किनळेकर, प्रविण शांताराम पंडित, आदी उपस्थित होते. राज्य शासनाने मुख्यमंत्री शेतपाणंद रस्ते खुले करण्याचे आदेश दिल्यानंतर कास गावात तत्काळ कामाला सुरुवात करण्यात आली. सरपंच प्रवीण पंडित, ग्रामपंचायत अधिकारी ठाकूर तसेच गावातील शेतकरी यांच्या सहकार्याने अनेक वर्षांपासून बंद असलेले तब्बल नऊ शेतपाणंद रस्ते पुन्हा सुरू करण्यात आले. या कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी कास गावाला अचानक भेट दिली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेअंतर्गत शासकीय निधीचा वेळेत व योग्य वापर करून गावाच्या विकासासाठी मोठे योगदान दिल्याचे तहसीलदारांनी नमूद केले.
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत ट्रॅक्टर, यंत्रसामुग्री आणि वाहने सहज पोहोचावीत, तसेच उत्पादित मालाला योग्य हमीभाव मिळावा, या उद्देशाने हे रस्ते खुले करण्यात आल्याचे प्रवीण पंडित यांनी सांगितले. भुईमूग, शेंगदाणे, चवळी आणि नाचणी यांसारख्या पिकांच्या वाहतुकीसाठी हे रस्ते अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. पंडितवाडी ते किनळेकरवाडी तसेच किनळेकरवाडी ते पार हद्दीपर्यंतचे रस्ते लोकसहभागातून तयार करण्यात आले. काही रस्त्यांसाठी स्वतःच्या खर्चातूनही काम करण्यात आल्याचे प्रवीण पंडित यांनी स्पष्ट केले.



















































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.