दापोली (वार्ताहर) : दापोली शहरातील केळसकर नाका परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादातून तिघांना मारहाण करून कारची काच फोडल्याची घटना काल दुपारी घडली असून या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिपक दत्ताराम शेडगे हे आपल्या कुटुंबासह मूळ गावी टांगर गणपतीपुळे येथे नातेवाईकांच्या विवाह कार्यक्रमासाठी आले होते. काल ता. 15 रोजी सकाळी ते आपल्या नातेवाईकांसोबत मारुती सुझुकी बलेनो कारमधून दापोली बाजारपेठेत घरगुती साहित्य खरेदीसाठी आले होते. केळसकर नाका येथे वाहतूक कोंडी झाल्याने त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले. त्यावेळी राँग साईडला उभ्या असलेल्या एका छोट्या टेम्पो चालकाला वाहन व्यवस्थित लावण्यास सांगितल्याने दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर सर्व तेथून निघून गेले.
यानंतर दुपारी 12.45 चे सुमारास मच्छीमार्केट रोडवरील सावंत बिल्डिंगसमोर उभ्या असलेल्या त्यांच्या वाहनाजवळ ६ ते ७ जण मोटारसायकलींवरून आले. त्यांनी शेडगे यांच्या गाडीत बसलेल्या त्यांच्या नातेवाईकांना गाडी बाहेर ओढून मारहाण केल्याचा आरोप शेडगे यांनी तक्रारीत केला आहे. यावेळी एका व्यक्तीने बिअरची बाटली डोक्यात मारून दुखापत केली, तर दुसऱ्याने दगड मारून बलेनो कारची पुढील काच फोडल्याचे शेडगे यांच्या तक्रारीत म्हटले आहे. या मारहाणीत प्रविण प्रताप जेधे व स्वप्निल मारुती शेडगे हेही जखमी झाले. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी दीपक शेडगे यांनी संशयित आफ्रिदी अहमद जोगिलकर, अझर अहमद जोगिलकर, अलताफ अल्लाउद्दीन आलम सर्व रा. खोंडा दापोली तसेच अन्य चार जणांविरोधात मारहाण, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी व वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली असून दापोली पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 118(2),189(1),189(2),191(2), 324(3),115(2), 351(2), 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक राजकुमार यादव करत आहेत.



















































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.