loader
Breaking News
Breaking News
Foto

मला जेव्हा बोलायचं असेल तेव्हा मी नक्की बोलेन; सुनील तटकरेंचे सूचक विधान, वादावर मोठे संकेत

मुंबई : संघटनात्मक बदलांनंतर पक्षात अंतर्गत नाराजी वाढत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर अनेक वरिष्ठ नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्याने पार्थ पवार यांच्याबाबत थेट शरद पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली होती. कुटुंबप्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्यावी, अशी मागणी त्या नेत्याने केल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे देखील पक्षातील घडामोडींमुळे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांनी अचानक शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर हजेरी लावली होती. या भेटीनंतर त्यांनी ती फक्त शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी असल्याचे सांगितले होते. मात्र, या भेटीमागे राजकीय अर्थ शोधले जाऊ लागले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg