loader
Breaking News
Breaking News
Foto

खोपोलीतील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणी मुख्य हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात

पुणे:खोपोली मधील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या खून प्रकरणातील पसार आरोपी वानवडी पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. पुणे हडपसर मधील हांडेवाडी भागात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे आरोपीने त्याच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांसह काळोखे यांच्या खुनाची सुपारी घेऊन खून केल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक माहिती नंतर रायगडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खलील कुरेशी वय 23, राहणार सय्यद नगर हडपसर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे .हडपसर मध्ये रामटेकडी औद्योगिक वसाहतीत एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करून त्यांच्याकडे दोन साखळी सोन्याची चोरण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना उमरनूर खान, साहिल हबीब फकीर यांना अटक करण्यात आली. या दोघांची चौकशी करण्यात आली तेव्हा खलील कुरेशी हा खून करून पसार झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी खालीदचा तपास शोध सुरू केला. तपासात खालीद हडपसर मधील हांडेवाडी भागात येणार असल्याची माहिती वानवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अल्ताप शेख,सहाय्यक निरीक्षक उमाकांत महाडिक यांना मिळाली .त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. चौकशीत खालिदने खोपोलीतील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांचा दोन मित्रांशी संगमत करून खून केल्याची कबुली दिली. काळोखे यांचा खून करण्यासाठी त्यांना एकाने सुपारी दिल्याची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील ,गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता जाधव, सहाय्यक निरीक्षक उमाकांत महाडिक ,उपनिरीक्षक अलताप शेख ,सरफराज देशमुख , अतुल गायकवाड अमोल पिराने आणि विठ्ठल चोरवणे यांनी कारवाई केली.

टाइम्स स्पेशल

त्याने एका नेत्याने सुपारी दिल्याने खून केल्याचे म्हटले असून ती व्यक्ती कोण.? याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान आज हत्येच्या नवव्या दिवशी दिवंगत काळोखे यांच्या मुलींनाही मारण्याचा प्लॅन हल्लेखोरांचा होता असा धक्कादायक दावा त्यांच्या मुलीने केला होता तर काळोखे यांची हत्या सुपारी देऊनच करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती रायगडच्या पोलीस अधीक्षक आमचे दलाल यांनी दिली होती तसेच त्यांनी या अहवालात संशयित असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांचा या पुण्यात अद्याप तरी सहभाग आढळून आलेला नसल्याचे सांगितले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg