loader
Breaking News
Breaking News
Foto

महिलांना 18000 रुपये, मोफत वीज, कर सवलत ते फ्री बसपर्यंत; ठाकरेंच्या जाहीरनाम्यात काय-काय?

मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा युतीचा जाहीरनामा जाहीर केला. उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. या जाहीरनाम्यात 'बेस्ट'च्या घरगुती ग्राहकांना 100 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल. तसेच 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर पूर्णपणे माफ केला जाईल, असं आश्वासन ठाकरें बंधूंनी दिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जाहीरनाम्यातील महत्त्वाचे 10 मुद्दे... 1. मोफत वीज 'बेस्ट'च्या घरगुती ग्राहकांना 100 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल. 2. कर सवलत 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर (Property Tax) पूर्णपणे माफ केला जाईल. 3. हक्काची घरे: पालिका कर्मचाऱ्यांपासून मिल कामगारांपर्यंत सर्वांना हक्काची घरे दिली जातील. पुढील 5 वर्षांत 1 लाख मुंबईकरांना स्वस्त घरे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. 4. महिलांसाठी 'स्वाभिमान निधी': घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा 1,500 रुपये मदत दिली जाईल. तसेच महिलांसाठी दर 2 किमीवर सुसज्ज स्वच्छतागृहे आणि 'मासाहेब किचन'मधून 10 रुपयांत जेवण मिळेल. 5. आरोग्य सेवा: 5 नवीन मेडिकल कॉलेज आणि स्वतंत्र कॅन्सर रुग्णालय उभारले जाईल. जेनेरिक औषधे पालिकेच्या रुग्णालयात मोफत मिळतील. 6 बेस्टचा कायापालट: बेस्टच्या ताफ्यात 10 हजार इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट केल्या जातील आणि महिला-विद्यार्थ्यांना मोफत प्रवास दिला जाईल. 7. तरुणांसाठी रोजगार: 1 लाख तरुणांना स्वरोजगारासाठी 1 लाखापर्यंत अर्थसाहाय्य आणि गिग वर्कर्सना ई-बाईकसाठी व्याजमुक्त कर्ज मिळेल. 8. शिक्षण: पालिका शाळांमध्ये 12 वी पर्यंतचे शिक्षण दिले जाईल आणि 'बोलतो मराठी' उपक्रमातून मराठी भाषेचा प्रसार केला जाईल. 9. बिल्डरमुक्त मुंबई: रेसकोर्स, आरे जंगल आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची जमीन कोणत्याही बिल्डरला दिली जाणार नाही. 10. पेट फ्रेंडली मुंबई: पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र पार्क, ॲम्बुलन्स आणि श्मशानभूमीची सोय केली जाईल. 11. IPL मध्ये मुंबईकरांना संधी: मुंबईत होणाऱ्या संगीत कार्यक्रम, IPL सामन्यांमध्ये 18 ते 21 वयोगटातील तरुणांसाठी 1% तिकिटे मोफत राखीव असतील.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg