loader
Breaking News
Breaking News
Foto

आँचल फाउंडेशनतर्फे जालगाव नं.१ शाळेमध्ये बालिकांना दांडपट्टा प्रशिक्षण

दापोली (प्रतिनिधी) - आँचल फाउंडेशन आयोजित ज्ञानज्योती स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी बालिका दिनानिमित्त बालिकांना स्वसंरक्षणासाठी दांडपट्टा प्रात्यक्षिक व प्रशिक्षण व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित एकपात्री असा भरगच्च कार्यक्रम जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा जालगाव नंबर १ या ठिकाणी आँचल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने झाली. दांडपट्टा प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय निर्णायक पंच देवी चव्हाण, कुमारी दिया चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. सुंदर अशा एकापात्रीचे सादरीकरण कुमारी- निहारिका आनंद यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी आँचल फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा आदर्श बालिका पुरस्कार कु.स्नेहा साखरकर हिला चांदीचा गणपती, शाल व रोपवाटिका देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला दापोली नगरपंचायतीच्या नगरसेविका जया साळवी, जालगाव ग्रामपंचायतच्या सदस्या सौ.लिंगावळे, सौ. तांबे, सौ.दांडेकर, आँचल फाउंडेशनच्या सर्वेसर्वा आँचल पिल्ले, निहारिका, देवी, दिया, पलक, कार्तिक समित, दिपिका, सुहानी फाउंडेशनचे मार्गदर्शक रामलिंगम पिल्ले, आनंदकुमार पिल्ले त्याचबरोबर केंद्रीय प्रमुख सौ.जुवेकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.नांदिसकर, उपाध्यक्ष लोखंडे, मुख्याध्यापक श्री.चौगुले, सर्व शिक्षक वृंद आणि बालिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरसेविका जया साळवी यांनी आँचल फाउंडेशनच्या या समाजोपयोगी सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आनंद पिल्ले यांच्या सहकार्याने आणि प्रमुख मार्गदर्शनाखाली आँचल फाऊंडेशनने आपली सामाजिक बांधिलकी जपत एका महत्त्वाच्या कार्यक्रमाचा जालगाववासियांना लाभ मिळवून दिला, त्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg