loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली भेडशी येथे विहिरीत पडलेल्या वासराला जीवदान; स्थानिक युवकांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

साटेली भेडशी (प्रतिनिधी) : साटेली भेडशी येथील रहिवासी चंद्रकांत गवंडळकर यांच्या विहिरीत आज दुपारी अचानक एक वासरू पडल्याची थरारक घटना घडली. मात्र, मोर्ले येथील तरुण तुकाराम चुरमुरे यांनी दाखवलेले अचाट धाडस आणि स्थानिक लोकप्रतिनिधींसह युवकांच्या समयसूचकतेमुळे या वासराला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. या बचाव कार्याचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. ४ जानेवारी रोजी दुपारी चंद्रकांत गवंडळकर यांच्या विहिरीत वासरू पडल्याचे निदर्शनास आले. विहीर खोल असल्याने वासराचा जीव धोक्यात होता. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक व तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून मोर्ले येथील तरुण तुकाराम चुरमुरे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता तात्काळ विहिरीत उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला. या बचाव मोहिमेत साटेली भेडशीचे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत मयेकर तसेच सिद्धू कासार, शाम गोवेकर, रुषीकेश बांदोडकर, तुषार परमेकर आणि राहुल गवंडळकर व इतर नागरिकांनी मोलाची साथ दिली. बाळू चुरमुरे यांनी विहिरीत उतरून वासराला सावरले तर वर उपस्थित असलेल्या या सर्व युवकांनी आणि नागरिकांनी दोरखंडाच्या साहाय्याने अत्यंत शिताफीने वासराला सुखरूप विहिरीबाहेर ओढून काढले.

टाइम्स स्पेशल

सर्वांच्या सांघिक प्रयत्नांमुळे आणि योग्य समन्वयामुळे या मुक्या प्राण्याला कोणतीही इजा न होता जीवनदान मिळाले. एका संकटाच्या प्रसंगी धावून येत माणुसकीचे दर्शन घडवल्याबद्दल बाळू चुरमुरे आणि सर्व युवकांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg