loader
Breaking News
Breaking News
Foto

मॅरेथॉन धावलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू घटना नेमकी कोठे घडली ?

गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील उंबरगाव तालुक्याजवळील सोरठपाडा भागात एका खासगी शाळेने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत 15 वर्षीय विद्यार्थिनी रोशनी ही आपल्या शाळेचे प्रतिनिधित्व करत होती. ती पूर्णपणे निरोगी होती आणि सकाळी जेवण करून, आईचे आशीर्वाद घेऊन स्पर्धेत सहभागी झाली होती. ही स्पर्धा शालेय क्रीडा कार्यक्रमाचा भाग होती. पण या स्पर्धेत एक अनुचित प्रकार घडला. ज्यामुळे साऱ्यांनाच हादरा बसला. रोशनीने मॅरेथॉनची शर्यत यशस्वीपणे पूर्ण केली. मात्र शर्यत संपल्यानंतर काही वेळातच तिला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. तिची तब्येत अचानक बिघडली आणि ती अस्वस्थ झाली. शाळेच्या मुख्याध्यापकांनी तिला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही फायदा झाला नाही. तिची प्रकृती अधिकच खालावली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ताबडतोब रोशनीला उंबरगाव तालुक्यातील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. हा प्रकार घडला तेव्हा रोशनी फक्त 15 वर्षांची होती. तिच्या मृत्यूपूर्वीचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात ती स्पर्धेत सहभागी होताना दिसते.प्राथमिक तपासणीनुसार रोशनीला हृदयविकाराचा झटका आला असावा असे डॉक्टरांचे मत आहे. मात्र नेमके कारण काय होते हे समजण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. स्पर्धेनंतर लगेचच तिची तब्येत बिघडल्याने धावण्याच्या श्रमाशी याचा संबंध असू शकतो, असे बोलले जात आहे.

टाइम्स स्पेशल

रोशनीच्या आई सुनिताने शाळेवर गंभीर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. "मुलगी पूर्ण निरोगी होती, जेवण करून गेली होती, तरी असा प्रकार घडला. शाळेने योग्य काळजी घेतली नाही.", असा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी कुटुंबीयांनी प्रशासनाकडे न्याय मागितला आहे. हा धक्का सहन न झाल्याने संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडालंय.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg