loader
Breaking News
Breaking News
Foto

अल्पसंख्यांक सेल खेड तालुका प्रमुखपदी सबा दळवी यांची नियुक्ती

संगलट (खेड )(इक्बाल जमादार) - वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते , महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व अल्पसंख्यांक सेल जिल्हा अध्यक्ष सिकंदर जसनाईक यांच्या शिफारसीनुसार शिवसेना पक्षाच्या मुस्लिम अल्पसंख्यांक सेलच्या तालुकाप्रमुख पदी दाभीळ येथील राहिवाशी शिवसेना पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या सौ.सबा असलम दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदरचे नियुक्तीपत्र दापोली मतदार संघाचे आमदार, राज्यमंत्री ना.योगेशदादा कदम यांच्या हस्ते सौ.सबा दळवी यांना नुकतेच प्रदान करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा सक्रियपणे प्रचार आणि प्रसार व्हावा व शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याच्या दृष्टीकोनातुन ही नियुक्ती करण्यात आली आहे. सबा दळवी यांचे सामाजिक कार्य, महिला संघटन कौशल्य व शिवसेना पक्ष वाढीसाठी असलेले योगदान यामुळे त्यांना सदर पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg