loader
Breaking News
Breaking News
Foto

अमृता बांदेकर व स्वाती पाटील यांची योगासन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

बांदा (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने चालू २०२५–२६ या शैक्षणिक वर्षात शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या योगासन स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन महिला शिक्षिकांनी उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे. सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळगाव सावळ येथील शिक्षिका अमृता अनंत बांदेकर हिने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला, तर दोडामार्ग तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मोरगाव नं. १ येथील शिक्षिका स्वाती जक्कापा पाटील हिने द्वितीय क्रमांक मिळवला. कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागस्तरीय योगासन स्पर्धेत या दोघींनी उत्कृष्ट कामगिरी करत नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांच्या कलागुणांना व शारीरिक सुदृढतेला प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून योगासन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेच्या तालुकास्तरावर झालेल्या निवडीत अमृता बांदेकर हिने सावंतवाडी तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला, तर स्वाती पाटील हिने दोडामार्ग तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवत त्यानंतर विभागस्तरावर निवड झाली होती. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर येथे झालेल्या विभागस्तरीय स्पर्धेत कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील प्रत्येक तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या व कौशल्यपूर्ण स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अमृता बांदेकर व स्वाती पाटील यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवून जिल्ह्याला मानाचा लौकिक मिळवून दिला. या यशाबद्दल शिक्षण विभाग, शाळा प्रशासन, सहकारी शिक्षकवर्ग, विद्यार्थी व पालक वर्गाकडून त्यांचे कौतुक करण्यात येत असून नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg