loader
Breaking News
Breaking News
Foto

खांबाळे ग्रामपंचायतच्यावतीने वनराई बंधारे

वैभववाडी (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत खांबाळे ग्रामपंचायतीच्यावतीने ढोम्याच्या व्हाळावर दोन बारमाही वाहणारे वनराई बंधारे लोकसहभागातून व श्रमदानातून उभारण्यात आले. पावसाचे पाणी अडवून परिसरात जलसाठा निर्माण करणे, भूजल पातळी वाढवणे तसेच शेती व जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून देणे हा या बंधार्‍यांचा उद्देश आहे. स्थानिक गरजांचा विचार करून ग्रामपंचायतीने या कामाचे नियोजन केले होते. या उपक्रमासाठी ग्रामस्थांनी वेळ देऊन श्रमदान केले. लोकसहभागातून जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविता येतात, याचे हे उदाहरण ठरले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमासाठी माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांचे विशेष सहकार्य लाभले. कामाच्या नियोजनापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत त्यांनी आवश्यक समन्वय साधला. यावेळी गट विकास अधिकारी प्रीमेश वाघ, सहाय्यक गट विकास अधिकारी रामचंद्र जंगले, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, सरपंच प्राजक्ता कदम, उपसरपंच मंगेश गुरव, ग्रामपंचायत अधिकारी नयना गुरखे, सोसायटी चेअरमन प्रवीण गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष लवू पवार, माजी सरपंच विठोबा सुतार, संजय साळुंखे, मंगेश कदम, माजी चेअरमन दीपक चव्हाण, प्रमोद लोके, दिनेश पालकर, मंगेश कांबळे, राजेंद्र देसाई, संतोष राजाराम पवार, संकेश पवार, पाणी पुरवठा कर्मचारी अंबाजी पवार, योगेश मनोहर पवार, जयेश पवार, सत्यवान पवार, अक्षय पवार, मुकेश पवार, महेश चव्हाण, सुनील पवार, किशोर सुतार, सूर्यकांत सुतार, परेश साईल, मिलिंद पवार, प्रकाश लांजवळ, संदेश निग्रे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg