loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रीय महामार्ग विभाग कडून रेडियम,सूचनाफलक लावण्याचे काम , खेरशेत टोलनाका परिसर केला सुरक्षित

चिपळूण (संतोष पिलके ) : तालुक्यातील खेरशेत टोल नाका येथे बसविण्यात आलेले रस्ता दुभाजक अनेकदा वाहन चालकांना समजत नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते.सदरची गंभीर बाब सावर्डे पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या निदर्शनास अनेकदा आली. पोलीस अधिक्षक श्री नितीन बगाटे यांच्या सूचनेनुसार पाटील यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार यांच्या कडे ही बाब प्रभावीपणे मांडली.आणि त्वरित या गंभीर बाबीची दखल घेऊन आबासाहेब पाटील आणि राष्ट्रीय महामार्गाचे शहाबुद्दीन हे आपल्या टीम सह खेरशेत टोल नाका येथे दाखल झाले.येथे दुभाजक दिसत नसल्यामुळे प्रथमतः दोन्ही बाजूस रेडियम,वळण दाखवणारे सूचनाफलक तसेच टोलनाका येण्यापूर्वी काही अंतरावर सूचना आदींसारख्या आवश्यक उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी केली.याकामी सावर्डे पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील महत्वपूर्ण कामगिरी बजावली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामुळे महामार्गावरती वाहन चालक थेट येऊन येथे धडकण्याचे प्रमाण पूर्णपणे कमी होण्यास मदत होणार आहे.यावेळी अनेक वाहनचालकांनी थांबून आबासाहेब पाटील आणि राष्ट्रीय महामार्गाचे आभार व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg