loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी राम आळी येथे फुटपाथवरील फिरस्त्यावर बँक वॉचमनचा अमानूषपणे जीवघेणा हल्ला

रत्शनागिरी : शहरातील एका बँकेसमोर असलेल्या फुटपाथवरील मोकळ्या पॅसेजमध्ये झोपलेल्या एका फिरस्त्या व्यक्तीवर बँकेच्या वॉचमनने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी सुमारे आठच्या सुमारास घडली. या हल्ल्यात संबंधित फिरस्ता व्यक्ती गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, राम आणि परिसरातील एका बँकेबाहेर असलेल्या मोकळ्या पॅसेजमध्ये सदर फिरस्ता व्यक्ती शनिवारी रात्री झोपली होती. रविवारी सकाळी बँकेच्या वॉचमनने त्या व्यक्तीला तेथून उठून जाण्यास सांगितले. मात्र झोपलेली व्यक्ती उठण्यास तयार नसल्याने वॉचमनचा संताप उफाळून आला.या रागाच्या भरात वॉचमनने हातात असलेल्या स्टीलच्या रॉडने फिरस्त्या व्यक्तीवर बेछूट हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता की रस्त्यावर रक्ताचा सडा पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या जखमी व्यक्तीला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हल्ला करणाऱ्या वॉचमनला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg