loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणुकीपूर्वीच बीएमसीच्या माजी महापौरांचा राजीनामा

मुंबई. मागील अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. 15 जानेवारी रोजी मुंबई महानगरपालिकेसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी आता प्रचाराला रंगत येणार आहे. पण ऐन प्रचारकाळात ठाकरेंना धक्का बसला आहे. कारण उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या एका बड्या महिला पदाधिकाऱ्याने आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी राजीनामा दिला आहे. राऊळ यांच्या राजीनाम्याने महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महापालिका निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानाला अगदी 10 दिवस बाकी असताना मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी राजीनामा दिला आहे. राऊळ यांच्या राजीनाम्याने महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. काही कारणास्तव राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. दुसरीकडे शिवसेना राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आमदार प्रवीण दरेकर यांच्या निवासस्थानी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाविषयी चर्चा सुरू आहेत.

टाइम्स स्पेशल

मी, शुभा उमेश राऊळ, हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांवर आणि आपल्या नेतृत्वावर अढळ विश्वास ठेवून मनापासून शिवसेनेत कार्यरत राहिले आहे. तथापि, काही कारणास्तव मला शिवसेना अंतर्गत शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्ष या पदाचा तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करत आहे, याची नोंद घ्यावी. आपणा सर्वाकडून मिळालेल्या आजपर्यंतच्या सहकार्याबद्दल मी आभार व्यक्त करत आहे, असे शुभा राऊळ राजीनामा देताना म्हणाल्या.भा राऊळ भाजप पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. भाजप नेते आशिष शेलार यांच्या उपस्थित त्या भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. दहीसर येथे त्यांचा भाजप पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.शुभा राऊळ 33 महिने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर होत्या. महाराष्ट्र सरकारच्या कोविड-19 आयुष टास्क फोर्सच्या सदस्या होत्या. 10 मार्च 2007 रोजी त्या महापौरपदी निवडून आल्या होत्या. मुंबईच्या तिसऱ्या महिला महापौर होण्याचा मान त्यांनी मिळवला होता. दहिसर भागाचे प्रतिनिधित्व राऊळ यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg