चिपळूण | प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) संघटनेच्या वतीने चिपळूण नगरपरिषदेकरिता सौ. उमा उर्फ शिल्पा उदय देसाई यांची अधिकृतपणे गटनेतीपदी निवड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पक्षात नवचैतन्य निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
या संदर्भात पार पडलेल्या पक्षाच्या अधिकृत बैठकीत नगरसेवक नसरीन मुश्ताक कडस यांनी सौ. उमा उर्फ शिल्पा देसाई यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय रमेशभाई कदम तसेच उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांसमोर ठेवण्यात आला. बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमताने प्रस्तावास पाठिंबा दिला. त्यानंतर रमेशभाई कदम यांनी गटनेतीपदी निवडीस मान्यता देत या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. कोणताही वाद न होता एकमुखी निर्णयातून ही निवड पार पडली.पक्ष पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सौ. देसाई यांचे सामाजिक कार्य, पक्षासाठी केलेली निष्ठावान मेहनत आणि सामान्य जनतेशी असलेला थेट संपर्क या बाबी लक्षात घेऊनच त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण नगरपरिषदेत पक्ष अधिक प्रभावीपणे भूमिका मांडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या निवडीमुळे महिला नेतृत्वाला बळ देण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या धोरणाला अधिक मजबुती मिळाली आहे. येत्या काळात नगरपरिषदेत विकासात्मक प्रश्न, नागरिकांच्या समस्या व जनहिताच्या विषयांवर ठाम आणि सकारात्मक भूमिका घेण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.दरम्यान, सौ. उमा उर्फ शिल्पा उदय देसाई यांच्या गटनेतीपदी निवडीबद्दल पक्ष कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक संघटितपणे काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.















































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.