loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत ‘पोलीस स्थापना दिन’ सप्ताहाचे उत्साहात उद्घाटन

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - पोलीस दल हे २४ तास जनतेच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी तत्पर असते. पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी शस्त्रास्त्रे आणि पोलीस कामकाजाची माहिती अभ्यासपूर्ण दृष्टीने घ्यावी. भविष्यात विद्यार्थ्यांनी देशसेवेसाठी स्वतःला तयार ठेवावे, असे आवाहन सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोसले यांनी केले. ​महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने २ जानेवारी ते ८ जानेवारी या कालावधीत 'पोलीस स्थापना दिन सप्ताह' साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त सावंतवाडी येथील जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानात पोलीस दलातील विविध विभागांच्या कामकाजाची माहिती देणाऱ्या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन नगराध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नागरिक आणि विद्यार्थ्यांना पोलीस दलाच्या कार्यपद्धतीची ओळख व्हावी, यासाठी विविध स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शन, ​बॉम्ब शोध व नाशक पथक (BDDS): स्फोटकांचा शोध घेणारी उपकरणे आणि कार्यपद्धती, महिला-बालक सुरक्षा आणि वाहतुकीच्या नियमांची जनजागृती, पोलीस बँड पथकाचे सादरीकरण, माहिती देण्यात आली. ​या उद्घाटन प्रसंगी युवराज लखमराजे भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, श्री. लोहकरे यांच्यासह पोलीस कर्मचारी, नागरिक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg