loader
Breaking News
Breaking News
Foto

विद्यार्थ्यांनी अभ्यास, खेळ त्याचबरोबर दर्जेदार छंद जोपासावेत : ॲड.दिलीप चव्हाण

दापोली (प्रतिनिधी) - विद्यार्थ्यांनी वाचन करून मनन करीत अभ्यास केल्यास वाचलेले चांगले लक्षात राहते, खेळ खेळताना त्यातील बारकावे न्याहाळावे आणि आपला खेळ अधिक चांगला करावा आपल्या आवडीचे दर्जेदार छंद निवडून ते जोपासल्यास भविष्यात त्याचा दैनंदिन जीवनात चांगला उपयोग होईल असे प्रतिपादन खेड येथील सिद्धयोग विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक, एडवोकेट दिलीप चव्हाण यांनी नुकतेच केले, जि. प. आदर्श जीवन शिक्षण विद्यामंदिर हर्णे , नंबर एक शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर ते बोलत होते. रत्नागिरी जिल्ह्यातील जि. प. शाळांपैकी आपली शाळा 475 विध्यार्थी एवढ्या मोठ्या पटसंख्येची शाळा असून सर्व च्या सर्व आदर्श विद्यार्थी घडवण्याचे आव्हान शाळेतील शिक्षकांनी घेतले आहे, ही बाब उल्लेखनीय आहे असेही ते पुढे म्हणाले. प्रा. ॲड. दिलीप चव्हाण आणि सचिन चाफे यांनी विद्यार्थ्यांना बाललैंगिक कायदा, मोटर वाहन कायदा, सायबर लॉ, मोबाईल चा वापर इत्यादी कायदे विषयक विषयाबरोबर विद्यार्थ्यांनी स्वतःचा अभ्यास स्वतः कसा करावा आणि व्यक्तिमत्व विकास याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शाळेच्या मुख्याध्यापिका सायली तांबे यांचे हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन प्रा. ॲड. दिलीप चव्हाण आणि सचिन चाफे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास विद्यार्थी पालक ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधीर राणे यांनी प्रा. ऍड .दिलीप चव्हाण आणि सचिन चाफे यांचे विशेष आभार मानले. केंद्रप्रमुख जलील ऐनरकर, विस्तार अधिकारी बळीराम राठोड, गटशिक्षण अधिकारी रामचंद्र सांगडे यांनी या शैक्षणिक मार्गदर्शनास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षिका शैला चांदोरकर, दर्शना मळवे, कांचन जाधव, अपर्णा बारस्कर, किरण पवार, संजना गिम्हवणेकर, श्रद्धा कोंडविलकर, ज्योती कदम, पठाण यांनी अथक परिश्रम घेतले. असे कायदे विषयक मार्गदर्शन वकिलांतर्फे विध्यार्थ्यांना दिल्यास त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या मनावर निश्चित होऊन त्यांच्या व्यक्तिमत्वात अमूलाग्र बदल होईल असा विश्वास श्रद्धा कोंडविलकर यांनी प्रगट केला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg