loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई गोवा महामार्गावर एक्सेल फाटा लोटे येथे एर्टिगा गाडी जळाली

गुणदे (वार्ताहर) - मुंबई-गोवा महामार्गावर लोटे एमआयडीसी येथे एक्सेल फाटा येथे पहाटे पाचच्या दरम्यान गोव्याकडे जाणारी ईरटीका गाडी चालकाचा ताबा सुटल्याने महामार्गावरील डिव्हाइडेडवर जाऊन धडकली. या गाडीने तात्काळ पेट घेतला परंतु सुदैवाने गाडीतील सुखरूप बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची खबर लोटे औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना कळल्यावर अग्निशमन दलाचे अधिकारी वाय.आर.नलावडे, प्रमुख अग्निशमन विमोचक एस.एस.कुळे, यंत्रचालक एम.एस.मोरे, एम.एम.कालेकर, अग्निशमन विमोचक व्ही.एन.रोमन, एच.एस.मोरे, ए.एस.भोसले, व्ही.व्ही.शिंदे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पाण्याच्या सहाय्याने कारची आग विझवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लोटे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास मुंबईकडून चिपळूण गुहागरकडे जाणारी एर्टिगा गाडी घेऊन चालक लासीर खळे एक्सेल फाटा येथे आले असता पहाटे पाचच्या दरम्यान समोर येणाऱ्या गाईला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना एर्टिगा गाडी डिव्हायडरवर आदळली. तिथे हेडलाईटला स्पार्किंग झाल्यामुळे गाडीने पेट घेतला मात्र सुदैवाने गाडीतील दोन प्रवासी सुखरूप बाहेर पडले परंतु गाडी जळून खाक झाल्याने व गाडीतील सामानही जळून खाक झाले त्यामुळे नुकसान झाले. लोटे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून अधिक तपास करत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg