loader
Breaking News
Breaking News
Foto

यशस्वी उद्योजक प्रकाश देशमुख यांचा वाढदिवस व मराठा महाकुटुंब तर्फे चिपळूणचे नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार सोहळा

चिपळूण (संतोष पिलके ) : येथील यशस्वी मराठा उद्योजक प्रकाशराव दादासाहेब देशमुख यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेश सकपाळ तसेच नगरसेवक कपिल शिर्के,नूतन नगरसेविका अंजली कदम,पल्लवी उर्फ राणी महाडिक, हर्षदा पवार,उमा देसाई, कांचन शिंदे यांचा नगरपालिका निवडणुकीमध्ये यश संपादन केल्याबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, सचिन कदम, दिलीप चव्हाण, अनिरुद्ध शेखर निकम,प्राजक्ता टाकळे, ऐश्वर्या घोसाळकर तसेच देशमुख कुटुंबीय आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

येथील मराठा महा कुटुंब तर्फे चिपळूण मधील नूतन नगराध्यक्ष उमेश सकपाळ व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा तसेच मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक , यशस्वी मराठा उद्योजक , अतिथी हॉटेल समूहाचे अध्यक्ष प्रकाश राव दादासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सदरच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . याप्रसंगी सचिन कदम भाजपचे जिल्हाप्रमुख सतीश मोरे प्रभाकर जाधव, अनिरुद्ध निकम तसेच विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना मराठा बांधवांनी एकत्र येऊन समाजाचे नाव रोशन करण्याची भावना व्यक्त केली

टाइम्स स्पेशल

उद्योजक प्रकाश देशमुख यांनी आपल्या वाढदिवसाच्या वाढदिवस अभिष्टचन सोहळ्याला उत्तर देताना त्या समाजामध्ये आपण मोठे होतो त्या समाजाचे आपण दायित्व म्हणून सतत बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करतो जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी चिपळूण ची आठवण येते चिपळूणमध्ये जो माणूस घडतो तो जगाच्या पाठीवर कुठेही कमी पडत नाही असे सांगताना सभागृहामध्ये टाळ्या झाल्या. तसेच चिपळूण मधील प्रस्तावित मराठा भवन साठी प्रकाश देशमुख यांनी एक कोटी रुपयांची मदत जाहीर करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे दिसून आले.सदरचा सोहळा अतिथी हॉटेल सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता . यावेळी प्रकाश देशमुख तसेच नगराध्यक्ष उमेश सपकाळ व नवनिर्मित नगरसेवक नगरसेविका यांना शुभेच्छा देण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg