loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली, मंडणगड, खेड तालुक्यातील विकास कामांच्या पूर्ततेसाठी भरघोस निधी मिळवण्यात नाम. योगेश कदम यशस्वी

दापोली (प्रतिनिधी) - योगेशदादा आमदार आणि कामगिरी दमदार हे जणू समीकरणच गेल्या सात वर्षात बनले आहे. त्याचा प्रत्येय पुन्हा एकदा दापोली मतदार संघातील कित्येक वर्षे रखडलेल्या विकास कामांच्या पूर्ततेसाठी निधी उपलब्ध करून दिल्याने पाहायला मिळाला आहे. दापोली मतदार संघासाठी तब्बल ४९ वर्षानंतर योगेशदादा कदम यांच्या रूपाने या मतदार संघाला मंत्रीपद मिळाले आहे. त्या मंत्रिपदाचा ख-या अर्थाने उपयोग हा योगेशदादा कदम यांनी उपलब्ध करून दिलेल्या भरघोस विकास निधीच्या उपलब्धतेमुळे मतदार संघातील दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यातील गाव वाड्या-वस्त्यांमधील विकास कामांसाठी होत असल्याची बाब अधोरेखित झाली आहे. दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे गृह (शहरे) महसूल, ग्रामविकास व पंचायती राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषधी प्रशासन राज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी राज्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचे काम पाहत असताना गेल्या दिड दोन वर्षांत कित्येक वर्षे रखडलेल्या विकास कामांना मंजुरी देऊन विकासाचा मागासलेला अनुशेष भरून तर काढलाच आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सन २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खेड तालुक्यातील अनेक वर्ष रखडलेल्या पोयणार लघु पाट बंधारे योजनेसाठी २६५ कोटी ३८ लाख रुपये तर न्यू मांडवे लघु पाटबंधारे योजनेसाठी १९५ कोटी ९६ लाख एवढा घसघशीत निधी उपलब्ध करून दिला आहे. शिवाय दापोली मंडणगड आणि खेड तालुक्यातील वर्षोनुवर्षे रखडलेल्या महत्त्वाच्या अशा विकास कामांना तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात ते यशस्वी झाले, हि बाब दापोली मतदार संघासाठी भुषणावह अशीच आहे. दापोली तालुक्यातील मौजे दापोली सारंग अडखळ रस्ता, जालगाव ते गावतळे रस्ता, मौजे दापोली सारंग कळंबट रस्ता, अडखळ पाज सालदुरे मुरुड कर्दे लाडघर रस्ता, पालवणी वेरळ उन्हवरे तोंडली विरसई खरवते लहान पुलाचे बांधकाम, पालवणी खेर्डी रस्ता असे दापोली तालुक्यासाठी एकुण १४ कोटी ४५ लाख रुपयांचा विकास निधी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर झाला आहे.

टाईम्स स्पेशल

खेड तालुक्यातील बोरघर वावे तर्फे नातू बौध्दवाडी ते चिंचवली शिंगर वाडी रस्ता, कुडोशी मांडवे दहीवली घोगरे रस्ता, आंबये शिवतर जामगे सातेरे शिरसाडी सोवेली रस्ता सुधारणा व कमकुवत पुलाची पुनर्बांधणी असा खेड तालुक्यातील विकास कामांसाठी ४ कोटी २५ लाख रुपये तसेच मंडणगड तालुक्यातील रेवस रेडी रस्त्याच्या समुद्राच्या कडेने रस्त्याचा पृष्ठभाग उंच करणे, धुप प्रतिबंधक बंधारा, संरक्षण भिंतीचे बांधकाम तर पुरार म्हाप्रल मंडणगड रस्ता राष्ट्रीय मार्ग १०१ ची सुधारणा व डांबरीकरण करणे तर मंडणगड पालवणी खेर्डी रस्ता रामा १३७ चे रुंदीकरण व डांबरीकरण.. अशाप्रकारे मंडणगड तालुक्यातील विकास कामांसाठी एकुण ६ कोटी ३० लाख रुपये विकास निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे दापोली विधानसभा मतदारसंघातील विकास कामांच्या पूर्तेचा आलेख हा योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून उंचावतच चालला आहे. त्यामुळे दापोली मंडणगड आणि खेड तालुक्यातील रहीवाशी मंत्री महोदय नाम. योगेशदादा कदम यांच्या दमदार कामगिरीचे समाधान व्यक्त करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg