सावंतवाडी (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांसह गोवा राज्यातील मोपा भागात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा ‘ओंकार’ नावाचा जंगली हत्ती आता अधिक आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ओंकार आता तरुण होत असून, त्याच्या नैसर्गिक स्वभावात होणाऱ्या बदलांमुळे तो नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतो, असा स्पष्ट इशारा सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक सुभाष पुराणिक यांनी दिला आहे. नागरिकांनी या हत्तीला 'पाळीव' समजण्याची चूक करू नये आणि वनक्षेत्रातील हालचालींबाबत कमालीची सतर्कता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
ओंकार हत्तीच्या बदलत्या वर्तनावर प्रकाश टाकताना श्री. पुराणिक म्हणाले की, हत्तींच्या कळपात वर्चस्वाची लढाई नेहमीच सुरू असते. सध्या सिंधुदुर्गच्या जंगलात वावरणाऱ्या 'बाहुबली' आणि 'गणेश' यांसारख्या मोठ्या नरांकडून ओंकारला कळपात स्थान दिले जात नाही. तरुण होणारा नर भविष्यात आपला प्रतिस्पर्धी ठरेल, या नैसर्गिक भीतीपोटी त्याला कळपाबाहेर ठेवले जाते. यापूर्वी ओंकारचे पूर्ण लक्ष कळपात सामील होण्याकडे असल्याने तो काहीसा शांत भासत होता. मात्र, आता तो वयात येत असल्याने चिडचिडा होण्याची किंवा 'मस्ती'वर येण्याची दाट शक्यता आहे. अशा स्थितीत त्याचे रूप अत्यंत रौद्र असू शकते.
गेल्या काही दिवसांपासून सावंतवाडी तालुक्यातील वाफोली आणि बांदा परिसरात ओंकारचा वावर वाढला आहे. बुधवारी रात्री या हत्तीने परिसरात मोठा उच्छाद मांडला. केवळ शेती आणि बागायतीचे नुकसान करून हा हत्ती थांबला नाही, तर त्याने आता आपला मोर्चा मानवी वस्तीतील वाहनांकडे वळवला आहे. रात्रीच्या सुमारास ओंकारने एका चारचाकी आणि दोन दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. या घटनेमुळे वाफोली परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून, हत्ती आता थेट घरापर्यंत आणि वाहनांपर्यंत पोहोचू लागल्याने भीती व्यक्त होत आहे.





















































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.