loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकण वासियांसाठी आनंदाची बातमी ! नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आजपासून नियमित सेवेत

खेड - (इक्बाल जमादार) - कोकणात जाणाऱ्या आणि विदर्भाला जोडणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून होत असलेली मागणी अखेर पूर्ण झाली असून नागपूर-मडगाव विशेष रेल्वे आता नियमित द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस म्हणून धावणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे चाकरमानी, पर्यटक आणि कोकणवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वेप्रशासनाने नागपूर-मडगाव-नागपूर विशेष गाडीला कायमस्वरूपी नियमित स्वरूप देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागपूरहून ही गाडी १६ मे २०२६ पासून प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी दुपारी ३:०५ वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५:४५ वाजता मडगाव येथे पोहोचणार आहे. तर मडगावहून १७ मे २०२६ पासून दर गुरुवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता गाडी सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ९:२५ वाजता नागपूरला पोहोचेल. या एक्स्प्रेसला प्रवाशांच्या सोयीसाठी वर्धा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड आणि करमाळी या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून भविष्यात कोकण-विदर्भ प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg