वरवेली (गणेश किर्वे) - आई - वडिलांच्या आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिद्दीने आणि प्रचंड परिश्रम घेऊन सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट मत गुहागर तालुक्यातील उमराठ गावची सुकन्या आणि गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे हायस्कूलची विद्यार्थिनी कु. समृद्धी सुरेश आंबेकर हिने व्यक्त केले. नुकत्याच झालेल्या इयत्ता १० वीच्या बोर्डाच्या परीक्षेत पाटपन्हाळे हायस्कूलची कु. समृद्धी सुरेश आंबेकर हिने ९९.२०% मिळवून गुहागर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. समृद्धीच्या या यशाचं गुहागर तालुक्यातील सर्वच स्तरांमधून अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत. समृद्धीच्या या यशाबद्दल गुहागर तालुका प्रेस क्लब गुहागरच्या वतीने भेटवस्तू देऊन तिचा सत्कार करण्यात आला. कुमारी समृद्धी हिच्याशी संवाद साधला असता आई वडील आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आय.ए .एस.होण्याचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे सांगितले.
कु.समृद्धी सुरेश आंबेकर पुढे म्हणाली की, आज मला जे यश मिळाले ते माझ्या आई-वडिलांमुळे आणि माझ्या मार्गदर्शक शिक्षकांमुळेच....सर्वात प्रथम जेव्हा आपण इयत्ता ९ वी तून १० वीत जातो, तेव्हा मनात भीती असते की पुढे काय होईल..?, कसं होईल...? पण माझ्या आई-वडिलांनी आणि माझ्या शिक्षकांनी माझ्या मनातील भीती सर्वप्रथम काढून टाकली त्यानंतर मी १० वीची परीक्षा कशी असते?, एकंदरीत परीक्षा कुठच्या महिन्यात होते...? पेपर कसे असतात. जाणून घेतले आणि अभ्यासाला सुरुवात केली. आपल्याकडे एक असा समज आहे की, इयत्ता १० वीचा अभ्यास हा सकाळी लवकरच उठून किंवा रात्री उशिरा जागून केला जातो. परंतु मी तसं काहीही केलं नाही.. मी माझे जे पहिली पासून इयत्ता ९ वी पर्यंत जे रुटीन होतं त्या रुटींग मध्येच अभ्यास केला. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत मी अभ्यास केला आहे. यामध्ये सकाळी ७:३० ते ९ वाजेपर्यंतचा वेळ मी वाचनाला दिला. आणि शाळेतून घरी आल्यावर सायंकाळी ५ ते रात्री २ वेळेत सर्व लिखाण पूर्ण करायची. त्यानंतर जशी जशी परीक्षा जवळ आली. तशी तशी मी विज्ञान ,गणित यासारख्या विषयांचा अभ्यास करण्यावर जास्त भर दिला आणि मराठी इंग्लिश, हिंदी, संस्कृत किंवा इतिहास असेल या विषयांचा कंटिन्यू अभ्यास चालू ठेवला
इयत्ता ९ वी मधून १० वीला जे विद्यार्थी जात आहेत त्या विद्यार्थ्यांना महत्वाची काय माहिती देऊ शकशील या प्रश्नावर कु. समृद्धी सुरेश आंबेकर म्हणाली की, सर्वप्रथम मी त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगेन की, इयत्ता १० वीची परीक्षा आहे. म्हणून घाबरून आणि गोंधळून जाऊ नका?१०वीच्या परीक्षा या शालेय वातावरणात होत असल्यामुळे त्याविषयी अजिबात भीती बाळगू नका. आपल्या परिसरातील शाळा हेच परीक्षेचे केंद्र असते त्यामुळे काळजी करायचे कारण नाही तुम्ही जर प्रामाणिकपणे अभ्यास केला असेल तर पेपर अगदी सोपा जाईल व छान लिहिता येईल.जसा तुम्ही पहिली पासून अभ्यास करत होतात तसाच अभ्यास . वेळेचे नियोजन करा आणि फक्त त्यात छोटे मोठे बदल करा आई-वडिल आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध अभ्यास करा यश निश्चित मिळेल असा संदेशही कु. समृद्धी सुरेश आंबेकर हिने दिला. कु. समृद्धीचा सत्कार करताना गुहागर तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष दिनेश चव्हाण, सल्लागार निसार खान, सुरेश आंबेकर,सचिव गणेश किर्वे, अमोल पोवळे उपस्थित होते.
























































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.