loader
Breaking News
Breaking News
Foto

१० ते १५ दरम्यान अचारसंहिता लागणार, निवडणूकीचा धुरळा उडणार

मुंबई - जिल्हा परिषद, पंचायत समितीसह राज्यभरातील नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुका डिसेंबर महिन्यामध्ये होण्याची शक्यता असून १० ते १५ नोव्हेंबरच्या आसपास राज्यात या निवडणुकांची आचारसंहिता लागू शकते. दरम्यान या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाची एक महत्वाची बैठक गुरुवारी बोलावण्यात आली आहे. या बैठकीमध्ये जि.प. आणि न.प.निवडणुकांच्या कार्यक्रमावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. डिसेंबरमध्ये न.प. आणि जि.प.निवडणुकांचा तर जानेवारीमध्ये २९ महापालिकांच्या निवडणुकीचा बार उडू शकतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या ४ वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या असून सुप्रीम कोर्टाने कोणत्याही परिस्थितीत ३१ जानेवारी २०२६ पूर्वी या निवडणुका घेण्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाला दिले आहेत. गेल्या महिन्यात हे आदेश मिळाल्यापासून राज्य निवडणूक आयोग नगर परिषद, नगर पंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महानगर पालिकांच्या निवडणुकांच्या तयारीला लागला आहे. मतदार याद्या जारी झाल्या असून त्यावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. प्रभाग आरक्षण तसेच अध्यक्ष आणि नगराध्यक्षासह जि.प.अध्यक्षांचे आरक्षण निश्चित झाले आहे.

टाइम्स स्पेशल

लवकरच बिगुल वाजणार असून १० नोव्हेंबर किंवा त्यापूर्वी एखाद दुसर्‍या दिवशी या निवडणुकांची घोषणा होऊ शकते. म्हणजेच निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. याचा अर्थ १० नोव्हेंबरला राज्यात आचारसंहिता लागू शकते. लवकरच त्यासंदर्भात अधिसूचना जारी केली जाईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg