loader
Breaking News
Breaking News
Foto

संगनमताने हत्या करून सोनसाखळी लंपास— तीन आरोपींना जन्मठेप

खेड - मंडणगड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या संगनमताने हत्या आणि लूटप्रकरणात खेड न्यायालयाने तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. दि. ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक ४७/२०१७, सेशन केस क्रमांक ०४/२०१८ या प्रकरणात जिल्हा न्यायाधीश (१) व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.एस. चांदगुडे यांनी गुरुवार दि. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी हा ऐतिहासिक निकाल दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या गुन्ह्यातील दोषी आरोपी १) अभिजीत सुधाकर जाधव (२७), रा. गव्हे, ता. दापोली, २) नरेंद्र संतोष साळवी (२८), ३) अक्षय विष्णू शिगवण (२८), रा. बोंडीवली, ता. दापोली, जि. रत्नागिरी — यांना भा.द.वि. कलम ३०२, ३९२, ३९७, १२०(ब), २०१ अंतर्गत दोषी ठरविण्यात आले. कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व ₹५,००० दंड कलम ३९२ अंतर्गत ७ वर्षे सश्रम कारावास व ₹५,००० दंड कलम ३९७ अंतर्गत ७ वर्षे सश्रम कारावास व ₹५,००० दंड कलम १२०(ब) अंतर्गत जन्मठेप सश्रम कारावास व ₹५,००० दंड कलम २०१ अंतर्गत जन्मठेप सश्रम कारावास व ₹५,००० दंड दंड न भरल्यास प्रत्येक कलमासाठी ३ महिन्यांची साधी कैद ठोठावण्यात आली आहे. आरोपींकडून मिळालेल्या एकूण दंडरकमेपैकी ₹२०,००० फिर्यादीस नुकसानभरपाई म्हणून आणि उर्वरित रक्कम सरकारकडे जमा करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

टाइम्स स्पेशल

आरोपींनी आर्थिक हव्यासापोटी राजाराम बाळकृष्ण चव्हाण यांची हत्या केली. त्यांनी मोबाईल सिमकार्ड वापरून बनावट ट्रिपचे आमिष दाखवून मयतास टाटा मॅजिक (क्र. एमएच-०८ झेड ९३८९) घेऊन बोलावले. त्यानंतर आरोपींनी मयतावर सुरा आणि दगडाने हल्ला करून त्यांची हत्या केली. मृतदेह पुलाखालील सिमेंट पाईपमध्ये टाकून पुरावा नष्ट केला आणि गळ्यातील सोन्याची साखळी तसेच दोन मोबाईल चोरले. सरकारी पक्षातर्फे एकूण ३२ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. मोबाईल लोकेशन, सीडीआर, एसडीआर, न्यायवैज्ञानिक अहवाल आणि घटनास्थळी सापडलेले पुरावे यांचा सखोल अभ्यास करून न्यायालयाने आरोपी दोषी ठरवले. सरकारी पक्षाचे कामकाज ऍड. मृणाल जाडकर यांनी उत्कृष्टपणे पार पाडले. तपास अधिकारी अनिल गंभीर (पोलीस निरीक्षक, मंडणगड), कोर्ट पैरवी अधिकारी उपनिरीक्षक हरिश्चंद्र पवार तसेच महिला पोलीस हवालदार वैशाली सुकाळे यांनी प्रकरणात मोलाचे सहकार्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg