loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडशी नाका येथे शिवशक्ती ग्रुपतर्फे अभेद्य जलदुर्ग खांदेरी-उंदेरीची हुबेहूब प्रतिकृती साकारली

रत्नागिरी : महाराष्ट्राच्या वैभवशाली सागरी इतिहासाची आणि मराठा आरमाराच्या शौर्याची आठवण करून देणारा उपक्रम रत्नागिरीत उभा राहिला आहे. खेडशी नाका येथे शिवशक्ती ग्रुपतर्फे दरवषप्रमाणे या वषही एक आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या अभेद्य जलदुर्ग खांदेरी-उंदेरीची हुबेहूब प्रतिकृती या ग्रुपने अत्यंत परिश्रमपूर्वक साकारली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमामुळे रत्नागिरीतील तरुणांनी ऐतिहासिक वारसा जपण्याची आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली आहे. खेडशी येथील ऋतिक होरंबे आणि मंदार गावडे यांच्या नेतृत्वाखालील उमेश होरंबे, स्वरुप पालेकर, अथर्व होरंबे, निखिल होरंबे, ओमकार होरंबे, कार्तिक होरंबे, सर्वेश बारगुडे, हर्षद माईण, रविकांत इंडिगिरी, साहिल गावडे, साहिल माने, सुशांत भातडे, अनुज होरंबे, नील कुळ्यें, शुभम गावडे, सूरज गावडे, सिद्धेश होरंबे, वैभव पालेकर आणि ओंकार पालेकर या तरुणांनी एकत्रित येऊन या भव्य प्रतिकृतीच्या बांधकामात मोलाचे योगदान दिले आहे.

टाइम्स स्पेशल

शिवशक्ती ग्रुपने साकारलेली ही खांदेरी-उंदेरी किल्ल्याची प्रतिकृती नागरिकांसाठी प्रदर्शनाकरिता खुली करण्यात आली आहे. तरुणांना प्रेरणा देणारा आणि इतिहासाची ओळख करून देणारा हा स्तुत्य उपक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. हे प्रदर्शन त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत चालू राहणार असून, दररोज सायंकाळी 6.00 ते रात्री 11.00 या वेळेत खेडशी हायस्कूलसमोर, मोरेश्वर हॉटेल मागे, खेडशी नाका, रत्नागिरी येथे नागरिकांना ही किल्ल्याची प्रतिकृती पाहता येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg