loader
Breaking News
Breaking News
Foto

मोंथा वादळामुळे शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानाचे अधिकार्‍यांनी बांधावर जाऊन पंचनामे करा - आम. किरण सामंत

लांजा (प्रतिनिधी) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि मोंथा वादळामुळे अनेक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके, तांदूळ, नाचणी, फळबागा, तसेच झाडे कोसळणे अशा प्रकारच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार किरण सामंत यांनी प्रशासनाला तातडीने हालचाल करण्याचे निर्देश दिले आहेत. आमदार सामंत यांनी सांगितले की, वादळामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कृषी व महसूल, गटविकास अधिकारी विभागाच्या अधिकार्‍यांनी तात्काळ बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि पंचनामे करून अहवाल सादर करावा. शासनाकडून शेतकर्‍यांना शक्य तेवढी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच, त्यांनी संबंधित विभागांना आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ती यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आणि नागरिकांना मदतीचा हात देण्याचेही आवाहन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अवकाळी पावसामुळे आणि अलीकडील वादळामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिके, फळबागा, शेतीमाल तसेच घरांवरील छपरांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार किरण सामंत यांनी पालकमंत्री उदय सामंत यांची शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीबाबत सविस्तर चर्चा केली. जिल्ह्यातील परिस्थिती, नुकसानाचे प्राथमिक अंदाज, आणि प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यांची माहिती आमदार सामंत यांनी पालकमंत्र्यांना दिली. त्यांनी सांगितले की, शेतकर्‍यांवर संकट कोसळले आहे. शासनाने तातडीने मदतीचा निर्णय घ्यावा. मी स्वतः या संदर्भात शासनदरबारी शेतकर्‍यांना न्याय मिळावा यासाठी लवकरच अधिकृत मागणी करणार आहे.

टाइम्स स्पेशल

पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला नुकसानग्रस्त भागांचा तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून, शेतकर्‍यांना शक्य तितकी आर्थिक मदत देण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. आमदार सामंत यांनी पुढे सांगितले की, शेतकर्‍यांना मदत मिळेपर्यंत आम्ही पाठपुरावा करत राहू. शासनाने तत्काळ निर्णय घेऊन शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, हीच अपेक्षा आहे. या नुकसान बाबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषीमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. यावेळी कृषी अधिकारी अभिजित शेलार, जिल्हा नियोजन सदस्य राजू कुरूप, शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg