loader
Breaking News
Breaking News
Foto

तळेखोल गावातील असंख्य कार्यकर्ते विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात दाखल

दोडामार्ग (प्रतिनिधी) -विकास हा आमचा धर्म आणि सेवा ही आमची ओळख- या ध्येयाने प्रेरित होत तळेखोल गावातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टी पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वावर खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनावर आणि युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या संघटन कौशल्यावर ठेवलेला विश्वास या प्रदेशातून स्पष्ट दिसून येत आहे. कोकणात भाजपचा विस्तार हा केवळ राजकीय घटना नसून विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. भाजप हा विचार नाही ती एक दिशा आहे, राष्ट्रहिताच्या मार्गावर नेणारी दिशा आहे. असं मत भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भाजपचे लोकप्रिय युवा नेते विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली तळेखोल येथील अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी व्यासपीठावर माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, शहर अध्यक्ष राजेश फुलारी, शिरिष नाईक, महेश गवस, नागेश पर्येकर, शंकर फटि गवस, महेंद्र गवस, सगुण मोरजकर, उमेश गवस, मंगेश नाटेकर, राजू वारंग, सुहास दळवी, नाना देसाई, संजू उसपकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाजपमध्ये मोठ्या संख्येने अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

टाइम्स स्पेशल

फटि गवस, महेंद्र महादेव गवस, उमेश महादेव गवस, सगुण नकुळ मोरजकर, अक्षय वासुदेव गवस, रुपेश लक्ष्मण गवस, विजय लक्ष्मण धर्णे, प्रकाश शशिकांत गवस, सुशांत सुरेश गवस, गुरूदास सदा गवस, लक्ष्मण लाडु धर्णे, गितांजली गुरुदास गवस शुभम अंकुश गावडे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विशाल परब यांचे स्वागत करण्यात आले

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg