loader
Breaking News
Breaking News
Foto

सामाजिक बांधिलकी जपणारे जनसेवा युवा प्रतिष्ठान

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - आजच्या धकाधकीच्या जीवनात आजचा तरुण आपले करीयर घडविण्यात गुंतला आहे. नोकरी, कुटुंब आणि मित्र परिवार ह्या चाकोरीत अडकला आहे. अशावेळी हे सर्व सांभाळीत आपल्याला समाजासाठी सुद्धा काही उपयोगी करता येते, असा संदेश पालपेणे कुंभारवाडीतील युवकांनी दिला आहे. दिवाळीत प्रत्येकाने आपापल्या घरी आकाशकंदील किंवा दिवा लावून ही प्रकाशाची दिवाळी साजरी केली. त्याचवेळी ह्या तरुणांनी समाजोपयोगी कार्य करून सत्कार्याचा नवीन प्रकाश निर्माण केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जनसेवा युवा प्रतिष्ठान ही संघटना गेली सात वर्षे पालपेणे गावातील कुंभार वाडीत कार्यरत असून अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते. कोरोना काळात गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे पॅक देणे, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करणे, प्राथमिक शाळेतील अडचणी समजून त्याप्रमाणे मदत करणे. असे समाजोपयोगी उपक्रम प्रतिष्ठान राबवत असते. वादळामुळे बस थांब्याची शेड पडल्यानंतर प्रतिष्ठान तर्फे श्रमदान आणि आर्थिक मदत उभी करून ती बांधण्यात आली. आज वाडीतील नागरिक ह्या वस्तूचा लाभ घेत आहेत. अशाप्रकारे प्रतिष्ठानची समाजकार्यात यशस्वी वाटचाल सुरू आहे. गेली दोन वर्षे प्रतिष्ठान तर्फे "किल्ला शिवरायांचा - किल्ला बांधणी स्पर्धा" स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. ह्या स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद मिळतो तसेच सहभागी विद्यार्थ्यां सुद्धा अतिशय अभ्यासपूर्ण आणि कल्पकतेने किल्ला बनवितात.

टाइम्स स्पेशल

ह्याही वर्षी हा उपक्रम यशस्वीपणे राबवून विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि शालोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. तसेच ह्याच वर्षी दिवाळीच्या भाऊबीज दिवशी जलसंधारण उपक्रमाअंतर्गत नदीच्या पात्रात बंधारा बांधण्यात आला. पाण्याची उन्हाळ्यात होणारी टंचाई आणि दिवसेंदिवस पाण्याची खाली जाणारी भूजल पातळी ह्याचा विचार करून प्रतिष्ठानने हे पाऊल उचलले आहे. थोडा वेळ समाज कार्यासाठी दिला तर एक महत्त्वाचे काम उभे राहू शकते हा संदेश ह्या तरुणांनी ह्या कामातून दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg