loader
Breaking News
Breaking News
Foto

'अनमोल प्रभागसंघ, तळवडे' ची प्रभागस्तरीय मूल्यमापन कार्यशाळा उत्साहात

​सावंतवाडी (प्रतिनिधी) : 'उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान' आणि 'कुटुंब श्री केरळ NRO' यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या PRI-CBO अभिसरण प्रकल्पांतर्गत 'अनमोल प्रभागसंघ, तळवडे' ची एकदिवसीय 'प्रभागस्तरीय मूल्यमापन कार्यशाळा मळगाव येथे उत्साहात पार पडली. प्रकल्पांतर्गत प्रभागस्तरावर झालेल्या कामांचा आढावा घेणे, त्याचे मूल्यमापन करणे आणि भविष्यातील दिशा निश्चित करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. ​कार्यशाळेच्या शुभारंभास मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर, निरवडे सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, तसेच तळवडे ग्रामपंचायत सदस्य दादा परब, मांजरेकर आणि नम्रता गावडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसच 'कुटुंब श्री केरळ NRO' च्या मेंटॉर गिरिजा संतोष आणि तालुका अभियान कक्षातून BM IBCB स्वाती रेडकर यांची विशेष उपस्थिती लाभली.​प्रार्थना आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रभागसंघाच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रभाग समन्वयक सचिन नाईक यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले आणि प्रकल्पाची उद्दिष्ट्ये व आत्तापर्यंतचा प्रवास स्पष्ट केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यशाळेचा महत्त्वाचा भाग म्हणजे ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या कामाचे सादरीकरण. सर्व LRP (लोकल रिसोर्स पर्सन) ताई, ज्यात मयुरी दळवी, निकिता बुगडे, चैताली गावडे आणि पायल राऊळ यांचा समावेश होता, यांनी आपापल्या ग्रामपंचायत निहाय केलेल्या कामाचे सविस्तर पीपीटी (PPT) द्वारे सादरीकरण केले आणि आपले मनोगत व्यक्त केले. यासोबतच प्रभागात झालेल्या कामाचे व्हिडिओ प्रेझेन्टेशनही दाखवण्यात आले, ज्यामुळे कामाची गुणवत्ता आणि व्याप्ती सर्वांसमोर स्पष्ट झाली. ​यानंतर मान्यवरांनी प्रकल्पांतर्गत केलेल्या विविध उपक्रमांच्या प्रदर्शनीला भेट दिली. या प्रदर्शनीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे फाईल्स, तक्ते आणि माहितीचा संग्रह अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने मांडला होता. ​कार्यशाळेत बालसभा प्रतिनिधी म्हणून वैदेही राऊळ, सानवी गावडे, सिद्धाई वेटे आणि दत्तप्रसाद तेली यांनीही आपले प्रभावी मनोगत व्यक्त केले, ज्यामुळे या प्रकल्पातील समाजातील सर्वात लहान घटकाचा सहभाग अधोरेखित झाला.

टाइम्स स्पेशल

उपस्थित सर्व मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्रभागसंघाने केलेल्या कामाचे आणि आकर्षक प्रदर्शनीचे भरभरून कौतुक केले, तसेच पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या. DRP श्रावणी वेटे, BRP प्राची राऊळ, प्रभागसंघ पदाधिकारी विशाखा ठाकूर, रंजना तेली, संगीता राऊळ, कार्यकारी समितीचे सदस्य, सर्व LRP ताई, CRP ताई आणि इतर कॅडर या कार्यशाळेत सक्रिय सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभागसंघ सचिव रंजना तेली यांनी अतिशय खुबीने केले. शेवटी प्रभागसंघाच्या वतीने उपस्थितांचे आभार व्यक्त करून कार्यशाळेची यशस्वी सांगता करण्यात आली. या कार्यशाळेमुळे 'अनमोल प्रभागसंघा'चे काम अधिक बळकट होऊन ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg