loader
Breaking News
Breaking News
Foto

केळशी परिसरात यंदाही हापूस आंब्याचे आगमन उशीरा

केळशी (मंगेश पाटील) - दापोली तालुक्यातील केळशी परिसरातील आतगाव, आंबवली बु., रोवले, उंबरशेत, आडे, पाडले परिसरात लांबलेला पाऊस, चक्रीवादळ, वातावरणातील रोज होणारा बदल त्यामुळे आंब्याला मोहरधारणा उशिरा होणार असे दिसत आहे. चांगल्या प्रमाणात थंडी पडल्यास मोहर धारणा चांगली होते. यावर्षी ऑक्टोबर महिना संपला तरी अजूनही थंडीचे प्रमाण वातावरणात दिसून येत नाही. बदलत्या वातावरणामुळे यावर्षी आंबा आगमन उशिरा होणार हे निश्चित झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिवाळी झाली तरी थंडीचा पत्ताच नसल्यामुळे हापुस कलमांना मोहर दिसतच नाही त्यामुळे या भागातील बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. हापूस आंब्याला चांगल्या प्रकारे मोहर येण्यासाठी तेरा अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान सात दिवस असणे आवश्यक आहे. थंडी चांगल्या प्रकारे पडली नाही तर आंब्याला मोहर चांगल्या प्रकारे येत नाही तर तो उशिरा येतो त्याचा फळ उत्पादनावर परिणाम होतो. गेल्या काही वर्षांपासून कोकणातील हापूस आंब्यावर बदलत्या हवामानाचा परिणाम दिसून येत आहे.

टाइम्स स्पेशल

मोहर उशिरा आला तर फळधारणा उशिरा होते साहजिकच फळे उशिरा तयार होतात. उशिरा हाती आलेला आंब्याला बाजारात अपेक्षित दर मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होते. केळशी परिसरातील आंबवली बु.येथील मोठे आंबा बागायतदार डॉक्टर विश्वास अशोक केळकर यांनी पत्रकारांशी बोलताना वरील प्रमाणे माहिती दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg