loader
Breaking News
Breaking News
Foto

पालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का,संजय राऊत 2 महिने सार्वजनिक जीवनापासून राहणार दूर

ज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील अन्य महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचं बिगुल येत्या काही दिवसात वाजण्याची शक्यता असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच शिवसेना ठाकरे गटाची मुलुखमैदानी तोफ असा लौकिक असलेले ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत हे पुढचे दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार आहेत. स्वत: संजय राऊत यांनी पत्र लिहून याबाबतची माहिती दिली असून, त्यामागचं चिंताजनक कारणही सांगितलं आहे. पक्षफुटीपासून पक्षचिन्ह व पक्षाचे नाव गमावलेल्या ठाकरे गटाला गेल्या दोन तीन वर्षांपासून अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. मुंबई महापालिकेत सत्ता राखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असताना त्यांचा एक शिलेदार बाजुला झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हँडलवर कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. यामध्ये संजय राऊत यांनी सांगितले आहे की, त्यांच्या प्रकृतीत गंभीर समस्या उद्भवल्या आहेत. त्यामुळे पुढील दोन महिने ते सार्वजनिक जीवनात वावरू शकणार नाहीत. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या काही वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या होत्या. मात्र आज एक पत्रक प्रसिद्ध करुन राऊत यांनी आपल्या आजाराबद्दल कार्यकर्त्यांना माहिती दिली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर दररोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांना भाजपला भंडावून सोडले होते. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे ..

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg