loader
Breaking News
Breaking News
Foto

"मुलांना ओलीस ठेवणं चुकीचं!"- माजी शिक्षणमंत्री केसरकर

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - मुंबईमध्ये एन्काऊंटर झालेल्या रोहित आर्या यांच्या 'स्वच्छता मॉनिटर' संकल्पनेसाठी शासनाने परवानगी दिली होती, मात्र मुलांकडून पैसे वसूल करून ते परत न केल्यामुळे त्यांचे बिल प्रलंबित राहिले, असे मत माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. केसरकर म्हणाले, "मुलांना ओलीस ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. जरी मी आता त्या खात्याचा मंत्री नसलो तरी, मुलांना वेठीस धरणं योग्य नाही." त्यांनी स्पष्ट केले की जर ते मुंबईत असते तर, जीवाची पर्वा न करता तिथे गेले असते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आम. केसरकर यांनी सांगितले की, त्यांनी यापूर्वी रोहित आर्या यांना सहानुभूतीपूर्वक आर्थिक मदत केली होती आणि चेकने पैसे दिले होते. "माझी भूमिका सहकार्याची होती, मात्र डिपार्टमेंटचे फॉर्म्युला पार पाडणं आवश्यक होतं. चुकीचा पायंडा पाडणं योग्य नाही," असे ते म्हणाले. बिल अदा झालं नाही म्हणून मुलांना ओलीस ठेवण्याचं टोकाचं पाऊल उचलणं योग्य नाही. अनेक लोकांची बिले प्रलंबित असतात, पण मुलांना वेठीस धरणं चुकीचं आहे, असे मत त्यांनी नोंदवले.

टाइम्स स्पेशल

ते म्हणाले, "नियमानुसार काम चालतं, त्यामुळे चुकीचे पाऊल उचलले जाणे अपेक्षित नाही."​यावेळी आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख संजू परब, अशोक दळवी, दिपलक्ष्मी पडते, दादा साईल, खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, प्रेमानंद देसाई, क्लेटस फर्नांडिस आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg