loader
Breaking News
Breaking News
Foto

रिपब्लिकन पक्षाचा 69 वा वर्धापन दिन सोहळा येत्या 3 नोव्हेंबर रोजी महाड येथे साजरा होणार

खेड (दिलीप देवळेकर) - महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा वर्धापन दिन 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता रायगड जिल्हातील महाडच्या क्रांतिभुमीत चांदे मैदान येथे आयोजित करण्यात आलेला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या 69 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणुन रोजगार हमी योजना मंत्री भरत शेठ गोगावले, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे, गृहराज्यमंत्री योगेश कदम; खासदार सुनील तटकरे; राज्यसभा खासदार धैर्यशिल पाटील, चिपळूण चे आमदार शेखर निकम, आमदार महेंद्र शेठ दळवी, आमदार विक्रांत पाटील, स्वयंपुर्णविकास प्राधिकरणाचे अध्यक्ष कॅबिनेट दर्जा मंत्री प्रविण दरेकर तसेच आमदार महेंद्र थोरवे आदि मान्यवर प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रिपब्लिकन पक्षाच्या 69 व्या वर्धापनदिन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे असून सभेचे प्रस्ताविक रिपाइं चे राज्य सरचिटणीस गौतम सोनावणे करणार आहेत. सभेचे स्वागत अध्यक्ष कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे आणि सहस्वागताध्यक्ष रिपाइं चे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र भाई गायकवाड आहेत. या सोहळ्याचे सुत्रसंचालन रत्नागिरीचे रिपाइं जिल्हा अध्यक्ष प्रितम रुके करणार असुन या सोहळ्याचे प्रमुख निमंत्रक म्हणुन सुशांतभाई सकपाळ, राहुल भाई सुनावले; आणि अजितकुमार कदम आहेत.

टाइम्स स्पेशल

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाची स्थापना 3 ऑक्टोबर 1957 रोजी झाली असुन यंदा च्या वर्षात 68 वर्ष पुर्ण झाली असुन 69 व्या वर्षात रिपब्लिकन पक्षाने पदार्पण केले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या 69वा वर्धापनदिन सोहळा दिनांक 3 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणार होता,. मात्र अवकाळी पावसाने अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले. त्यामुळे वर्धापन दिनाचा 3 ऑक्टोबर चा कार्यक्रम रद्द करुन येत्या दिनांक 3 नोव्हेंबर रोजी रिपाइं चा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्याचा निर्णय केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला होता. त्यानुसार येत्या दिनांक 3 नोव्हेंबर रोजी रिपब्लिकन पक्षाचा 68वा वर्धापनदिन सोहळा रायगड जिल्हातील महाड येथील क्रांतिभुमीत चांदे मैदान येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg