loader
Breaking News
Breaking News
Foto

कुंभार समाज सभागृहाचे भूमिपूजन उत्साहात

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा शहरातील कुंभारवाडी येथे संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार समाज बांधवांसाठी सामाजिक सभागृह उभारण्यात येत असून, नुकतेच या सभागृहाच्या इमारत बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आमदार किरण सामंत यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. कुंभारवाडी येथील सामाजिक सभागृहासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कार्यक्रमाला आमदार किरण सामंत यांच्यासह राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुनिल (राजू) कुरूप, तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, माजी नगराध्यक्ष मनोहर बाईत, माजी नगरसेविका दुर्वा भाईशेट्ये तसेच पदाधिकारी सचिन डोंगरकर, प्रसाद भाईशेट्ये, सामाजिक कार्यकर्ते पप्पू मुळे, माजी नगरसेवक मंगेश लांजेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी जागा मालक ह.भ.प.यशवंत लांजेकर, दिपक कुंभार, शिवराम कुंभार, लता कुंभार यांच्यासह लांजा कुंभार समाजाचे माजी अध्यक्ष विजय सोलगावकर, विद्यमान अध्यक्ष संतोष तुळसणकर, युवा अध्यक्ष पंढरीनाथ मायशेट्ये तसेच कुंभार समाजातील प्रतिष्ठित नागरिक सुभाष कुंभार, विनोद कुंभार, यशवंत कोळंबेकर, रविंद्र कुंभार तसेच प्रकाश कुंभार, हेमंत कुंभार, जितेंद्र कुंभार, संदिप कुंभार, अमोल कुंभार, पुंडलिक लांजेकर, दत्ताराम कुंभार, गुरुदास कुंभार, संकेत कुंभार, अनिकेत कुंभार, उमेश कुंभार, सयाजी वडवळकर, हरिश्चंद्र साळवी, मोहन गिरकर, हर्ष मेहेर, दिपक कोळंबेकर, पार्थ लांजेकर, साहिल कुंभार, संकेत साळवी आदींसह कुंभार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, आगामी काळात हे सभागृह कुंभार समाजाच्या विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे केंद्र ठरणार आहे असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg