loader
Breaking News
Breaking News
Foto

सैनिक नागरी सहकारी पतसंस्था सिंधुदुर्ग संस्थेच्यावतीने आर्मी डे साजरा

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणार्‍या सैनिक नागरी सहकारी पतसंंस्थेच्या वतीने आर्मी डे चे निमित्त साधुन बुधवारी कोलगाव शाखेतील सभागृहात १ जानेवारी ते ३१ डीसेंबर २०२४ मधील निवृत्त सैनिकांचा संस्थेने सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच प्रतीवर्षी प्रमाणे संस्थेकडे ज्या ठेविदारांसाठी लागु असलेल्या लकी डॉ योजनेची सोडत देखिल या दिवशी काढण्यात आली. या वर्षी कोलगाव, वेंगुर्ला, मालवण, सावंतवाडी विभाग, कलंबिस्त, या शांखाचे ठेविदार या योजनेचे मानकरी ठरले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या वेळी सत्कार मुर्ती सुभेदार मंगेश सावंत, सुभेदार मेजर बापु राऊळ, नायक पांडुरंग परब, नायक प्रमोद नाईक, नायक रामा गावडे, नायक नागेश गावडे, हवालदार सुरज सावंत, सुभेदार विष्णु देसाई, ऑ. लेप्टंनन उमेश वेंगुर्लेकर, सुभेदार किशोर ठाकुर, हवालदार निवास सावंत, हवालदार प्रसाद लोट, हवालदार महेश देसाई, हवालदार सचिन सावंत, हवालदार बाबुराव सावंत, सुभेदार मेजर राजाराम राऊळ, सुभेदार सिताराम दळवी, सुभेदार विनोद सावंत, सुभेदार लक्ष्मण सावंत इत्यादी निवृत्त सैनिक कुटुंबियासहित उपस्थित होते. तसेच संस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, व्हा. चेअरमन चंद्रकांत शिरसाट, संचालक दिनानाथ सावंत, सुभाष सावंत, भिवा गावडे, श्यामसुंदर सावंत, चंद्रशेखर जोशी, संतोष मुसळे, वावु वरक, शांताराम पवार, श्री. शशिकांत गावडे, संचालिका सौ. प्रियांका गावडे. तज्ञ संचालक ताडोबा गवस, पद्मनाभ परब, शाखांचे स्थानिक संचालक मुख्यकार्यकारी अधिकारी सुनिल राऊळ तसेच जिल्हयातील विविध भागातील बहुसंख्य माजी सैनिक संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, ठेविदार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts