loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत ढगफुटी सदृश्य पाऊस; भातशेती बुडाली, मत्स्य व्यवसाय ठप्प, बाजारपेठेवर परिणाम

रत्नागिरी (रत्नागिरी टाइम्स डेस्क) - रत्नागिरी शहर व जिल्ह्यात मध्यरात्रीपासून ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत असून दैनंदिन जीवनमान ठप्प झाले आहे. मोठ्या चक्रीवादळाने कोकणच्या भातशेती व नाचणी पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे. पावसामुळे पिकलेली भातशेती शेतातच जमीनीला बिलगली आहे. त्यामुळे पुन्हा भाताचे दाणे रुजून येण्याची शक्यता बळावली आहे. मराठवाडा विदर्भात महापूराने येथील शेती उध्वस्त केली आणि वादळी पावसाने कोकणची शेती उध्वस्त केली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यात भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश शासन स्तरावर देण्यात आले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या १५ दिवसांपासून मासेमारी व्यवसाय ठप्प झाला आहे. त्याचा बाजारपेठेवर परिणाम झाल्याचे दिसून येते. हजारों लोकांना रोजगार देणारा मत्स्य व्यवसाय ठप्प झाल्याने सर्वसामान्य जनतेची आर्थिक कोंडी झाली आहे. शेतकरी व मच्छीमार या दोघांनाही शासनपातळीवर तातडीने आर्थिक मदतीची गरज व्यक्त केली जात आहे. दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून लोक घरातच थांबले आहेत. या वादळी पावसाचा बाजारपेठेवर परिणाम झाला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg