ठाणे (प्रतिनिधी) : मुंबई नाशिक महामार्गावर खाडी ब्रीजच्या पुढे खारेगाव टोल नाक्याजवळ कंटेनर आणि दुचाकी यांच्यात शनिवारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील नव दाम्पत्याचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या अपघाताची माहिती मिळताच कळवा पोलिस तसेच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कंटेनर चालक शिवकुमार सिंग याला ताब्यात घेतले. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातात कल्पेश रेवाळे (३०) आणि त्यांची पत्नी मिनाक्षी रेवाळे (३१) या दाम्पत्याचा अपघातात मृत्यु झाला असून हे दाम्पत्य भांडूप परिसरात राहत होते. नुकतेच लग्न झाले होते. कल्पेश हा एचडीएफसी बँकेच्या अंधेरी शाखेत तर, त्याची पत्नी मिनाक्षी या ॲक्सीस बँकेच्या कलिना शाखेत नोकरी करत होत्या. मिनाक्षी यांची आई डोंबिवली परिसरात राहत असून ती आजारी आहे. तिला पाहण्यासाठी कल्पेश आणि मिनाक्षी हे दोघे त्यांना भेटण्यासाठी शुक्रवारी डोंबिवलीत दुचाकीने गेले होते. त्यांनी आईच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यादिवशी त्यांनी तिथे मुक्काम केला. शनिवारी सकाळी ते दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. कल्पेश हे दुचाकी चालवित होते तर, मिनाक्षी या दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या होत्या. मुंबई-नाशिक महामार्गावरून ते मुंबईच्या दिशेने जात होते.
त्यावेळी खारेगाव टोलनाक्याजवळ त्यांच्या दुचाकीला कंटनेरची धडक बसली आणि या अपघातात कंटेनरच्या चाकाखाली येऊन दोघांचा जागीच मृत्यु झाला. सदर अपघातप्रकरणी कंटेनर चालक शिवबहादुर यास कळवा पोलीस स्टेशनची बीट मार्शल पोलिस हवालदार गायकवाड यांच्या ताब्यात दिले आहे. सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.














































































2.jpg)





























.jpg)





























































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.