loader
Breaking News
Breaking News
Foto

दाभोळे बुद्ध विहार येथील पंकज कांबळे या तरुणाची रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात निवड

साखरपा (दीपक कांबळे) - संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे बुद्ध विहार येथील पंकज उदय कांबळे या तरुणाची रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात निवड झाल्याने साखरपा दाभोळे पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरुवातीच्या काळात कडी कडून येथे बीएड पदविका झाल्यानंतर प्रथम ओझरे येथील माध्यमिक विद्यालयात सुमारे सात वर्षे अध्यापनाचे काम केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा ध्यास घेऊन अभ्यास करण्यासाठी खूप मोठ्या जोमाने तयारी केली. विशेष म्हणजे घरी वडिलांना सोडून रत्नागिरी येथे खास अभ्यासासाठी त्याने चार वर्षे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पोलीस भरतीच्या दिशेने केला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आणि त्यातच आईचे छत्र हरपले असताना देखील अभ्यासाची कास मात्र सोडली नाही. अलीकडे झालेल्या पोलीस भरतीमध्ये त्याची निवड झाल्याने साखरपा दाभोळे पंचक्रोशी त्याच्यावर अभिनंदनचा वर्षा होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg