loader
Breaking News
Breaking News
Foto

जंगलात ‘ऑपरेशन सापळा’! शिकाऱ्यांविरुद्ध वनविभागाचा कडक इशारा

ठाणे (प्रतिनिधी) - संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरासह ठाणे वनपरिक्षेत्रात वन्यजीवांची शिकार रोखण्यासाठी वन विभागाने कडक पावले उचलली आहेत. अलीकडील काही शिकारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विभागाने ‘सापळे शोध मोहीम’ (Anti Snare Combing Operation) राबवून जंगलातील संशयास्पद हालचालींवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेदरम्यान जंगलातील अतिदुर्गम भागात विशेष पथकांकडून सखोल तपासणी करण्यात आली. वन्यप्राण्यांना अडकवण्यासाठी लावलेले फासे, सापळे किंवा अन्य बेकायदेशीर साधनांचा शोध घेऊन त्यांचे उच्चाटन करण्यात आले. यासोबतच संवेदनशील ठिकाणांची नोंद करून भविष्यातील धोके टाळण्यासाठी रणनीती आखण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम, मुंबई जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. वन विभागाच्या या कारवाईत स्थानिक वनअधिकाऱ्यांसह वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशन (WWA) व रेस्क्यू असोसिएशन फॉर वाईल्ड लाईफ वेलफेअर (RAWW) या संस्थांच्या स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांच्या सहकार्यामुळे जंगलातील सूक्ष्म हालचाली ओळखणे आणि वेळीच कारवाई करणे अधिक प्रभावी ठरले आहे.

टाईम्स स्पेशल

वन्यजीवांची शिकार रोखणे, त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणे आणि जैवविविधतेचे संतुलन टिकवून ठेवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारच्या सापळे शोध मोहिमा नियमितपणे राबवण्याचा निर्णय वन विभागाने घेतला असून, त्यामुळे शिकारी करणाऱ्या असामाजिक घटकांवर प्रभावी अंकुश बसण्याची शक्यता आहे. ही मोहीम उपवनसंरक्षक (ठाणे), सहाय्यक वनसंरक्षक (प्रा.प. वन्यजीव, ठाणे), वनपरिक्षेत्र अधिकारी ठाणे व वनक्षेत्रपाल येऊर यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg