loader
Breaking News
Breaking News
Foto

आठ वर्षाच्या ओवी गावडेचा चाफवलीत रंगला नमनाचा २०३ वा प्रयोग

देवळे (प्रकाश चाळके) - रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा जवळच्या निवळी गावातील नवलाई मित्र नमन मंडळ निवळी या नमनात राधेच काम करणारी ओवी सुशांत गावडे हिचा २०३ वा प्रयोग चाफवली येथील चाफनाथ मंदिरात चैत्र शिवरात्री उत्सवानिमित्त संपन्न झाला. ओवी गावडे ही बालकलाकार असून बालवाडी पासूनच तिने नवलाई मित्र मंडळ निवळी नमनात काम करण्यास सुरुवात केली. आत्ता ती तिसरी इयत्ता मध्ये शिकत असून ८ वर्षाची आहे. चाफवली येथील चाफनाथ मंदिर येथे तिचा २०३ वा प्रयोग जबरदस्त सादरीकरणाने सादर झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तिची छोट्या राधेची भूमिका सर्वांनाच भुरळ घालून गेली. तसेच तिने पोलीस खात्याच्या स्पेशल ‘साथ खाकी वर्दीची’ या एपिसोड मध्ये ही भूमिका केली होती. ओवीची राधा प्रेक्षकांना फारच भावली. तिने नाव ही फार सुंदर घेतलं ज्या समुद्रा मध्ये मोती मिळाले त्याच रत्नागिरी नाव, निवळी माझं गाव, ओवी माझं नाव तसेच या तिच्या २०३ वा प्रयोगासाठी चाफलीतील ग्रामस्थांनी तिचा सत्कार केला. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg