loader
Breaking News
Breaking News
Foto

हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयनी येथील स्मारकास विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट

खेड (प्रतिनिधी) - क्रांतिकारक हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आयनी येथील अनंत कान्हेरे स्मारक येथे शनिवार, दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल, खेडच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांना इतिहासाची ओळख प्रत्यक्ष ऐतिहासिक स्थळावरून करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांनी या भेटीत उत्स्फूर्त सहभाग घेत ऐतिहासिक वारशाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी हुतात्मा कान्हेरे स्मारक तसेच त्यांच्या जन्मवाड्यास भेट दिली. यावेळी शाळेतील शिक्षक अमोल नरवणकर यांनी विद्यार्थ्यांना कान्हेरे यांच्या जीवनकार्याविषयी व स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच कान्हेरे विद्यालयाच्या निवृत्त शिक्षिका रेखा कान्हेरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील धैर्य, निर्धार आणि देशप्रेमाची मूल्ये अधोरेखित केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देशप्रेम, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा या मूल्यांवर आधारित जीवन जगत प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करावे, असा प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. अशा ऐतिहासिक स्मारक भेटींमधून विद्यार्थ्यांना इतिहासाचा जिवंत अनुभव मिळतो व त्यातून मिळणारी प्रेरणा आयुष्यभर उपयोगी पडते, असेही यावेळी सांगण्यात आले. हा दिवस विद्यार्थ्यांसाठी अत्यंत संस्मरणीय ठरला असून त्यांच्या मनात देशभक्तीची भावना वृद्धिंगत झाली. तसेच इतिहास विषयाबद्दलची आवड अधिक दृढ झाली आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका मिनाक्षी निवाते यांनी केले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी विद्यार्थ्यांच्या या आगळ्यावेगळ्या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg