loader
Breaking News
Breaking News
Foto

नळपाणी योजनेचे पाईप आगीत भस्मसात

बांदा (प्रतिनिधी) - बिलेवाडी परिसरात उघड्यावर पडून असलेल्या नळपाणी योजनेच्या पाईपांचा आगीत भस्मसात होण्याचा प्रकार घडला. अचानक लागलेल्या या आगीत शेकडो पाईप जळून खाक झाले असून शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इन्सुली ग्रामपंचायत अंतर्गत नळपाणी योजनेसाठी नदीपासून टाकीपर्यंत टाकण्यासाठी हे पाईप आणून बिलेवाडी येथे ठेवण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी अचानक त्यांना आग लागली. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आग काही वेळातच पसरली. या आगीत नारळ, सुपारी तसेच इतर फळझाडांना झळ बसली. घटनेची माहिती मिळताच उपसरपंच नमिता नाईक, ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर तसेच ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. तीन वर्षांपासून पाईप उघड्यावर पडून असल्याबाबत ग्रामस्थांनी ठेकेदारावर संताप व्यक्त केला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची करण्याची मागणी केली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg