ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे महानगरपालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाशी संलग्नित ३८० पेक्षा अधिक महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या महिला विद्यार्थ्यांनींना आता स्पर्धा परीक्षांचे धडे गिरवता येणार आहेत. पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ आणि ठाणे महापालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था यांच्यात शुक्रवार दि. १७ एप्रिल २०२६ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव आणि यांच्या उपस्थित या सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या.
एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या महिला विद्यार्थ्यांनींना महाविद्यालयीन स्तरावरच युपीएससी आणि एमपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांसाठीचा अभ्यासक्रम पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षात खुले वैकल्पिक विषय (दोन क्रेडीट) स्वरुपात उपलब्ध करुन दिला जाणार आहे. तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली हे अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या या ओपन इलेक्टीव्हचे नियमन चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमार्फत केले जाणार आहे.
यावेळी विद्यापीठाचे निबंधक डॉ. विलास नांदावडेकर, लेखा व वित्त अधिकारी विकास देसाई, परीक्षा व मूल्यामापन विभागाचे संचालक डॉ. संजय नेरकर, मानवता विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. निलेश ठाकरे, आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर चव्हाण, विद्यापीठातील इतर प्राध्यापक व अधिकारी/कर्मचारी वर्ग यांच्यासह चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे संचालक महादेव जगताप, समन्वयक गिरीश झेंडे आदी उपस्थित होते.
















































































2.jpg)





























.jpg)





























































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.