loader
Breaking News
Breaking News
Foto

कोळंब येथे विहिरीत पडलेल्या भटक्या कुत्रीला जीवदान

मालवण (प्रतिनिधी) - कोळंब लाडवाडी येथील सुमारे ४० ते ५० फूट खोल विहिरीत पडलेल्या एका भटक्या कुत्रीला प्राणीमित्र आनंद बांबर्डेकर व स्वप्नील परुळेकर यांनी मोठ्या प्रयत्नांनी विहिरीबाहेर काढून जीवदान दिले. कोळंब लाडवाडी येथील विहिरीत एक भटकी कुत्री पडल्यावर तिला बाहेर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी प्रयत्न केले मात्र कुत्रीला बाहेर काढणे शक्य झाले नाही. याबाबत मालवणमधील सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांना माहिती देऊन पाचारण करण्यात आले. त्यानंतर प्राणीमित्र आनंद बांबर्डेकर यांना कळविण्यात आले. तर शिल्पा खोत यांनी कांदळगाव येथील स्वप्नील परुळेकर यांना बोलावून घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर विहीर अरुंद व अर्धवट कोसळलेली असल्याने तसेच रात्रीच्या वेळी अंधारात बचावकार्य करणे कठीण बनले होते. तसेच कुत्रीला विहिरीत पडून बरेच तास झाल्याने तीच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. मात्र आनंद बांबर्डेकर व स्वप्नील परुळेकर यांनी लोखंडी रिंग व जाळीच्या साहाय्याने आणि स्थानिकांच्या मदतीने त्या कुत्रीला सुखरूप विहिरीबाहेर काढत जीवदान दिले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg