loader
Breaking News
Breaking News
Foto

येडगेवाडीत जुन्या वादातून हाणामारी; सात जणांविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - ​संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडी येथे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तोडल्याच्या जुन्या वादातून एका ५५ वर्षीय व्यक्तीला लाकडी काठीने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात एकूण सात संशयित आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर भागोजी येडगे (वय ५५, रा. कुटगिरी येडगेवाडी, सध्या रा. नवी मुंबई) आणि संशयित आरोपी हे एकाच वाडीतील रहिवासी आहेत. त्यांच्यामध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तोडल्याच्या कारणावरून पूर्वीपासून वाद सुरू होता. याच जुन्या वादाच्या रागातून १७ एप्रिल २०२६ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास संशयित आरोपींनी फिर्यादीला गाठले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी संशयित आरोपी सुरेश बाबू येडगे आणि पांडुरंग बाबू येडगे यांनी फिर्यादीला लाकडी काठीने मानेवर व पाठीत मारहाण केली. तसेच संशयित आरोपी सुरेश धोंडीबा येडगे, तुकाराम विठ्ठल येडगे, जनार्दन धोंडीबा येडगे आणि इतर दोन-तीन जणांनी फिर्यादीला हाताच्या थापटाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. मारहाण करत असताना फिर्यादीला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ​या घटनेनंतर शंकर येडगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संगमेश्वर पोलिसांनी संशयित आरोपींविरुद्ध बी.एन.एस. कलम १८९(२), १९०, १९१(२), ११८(१), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार एस. एस. कोलगे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg