loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर पोलिसांची दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी; अवैध गावठी दारू जप्त, दोन जणांवर कारवाई

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गावठी हातभट्टी दारू विरोधात पोलिसांनी विशेष मोहीम राबवत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून गावठी दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. ​पहिली कारवाई: कळंबुशी येथे घरामागे जंगलात छापा..​मिळालेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी-मधलाकरंडा येथे ही कारवाई करण्यात आली. संशयित विनायक वसंत चव्हाण (वय ५८ वर्षे) याने आपल्या घराच्या पाठीमागील जंगलमय भागात विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू जवळ बाळगली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलीस कॉन्स्टेबल वैभवकुमार नारायण चौगले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, घटनास्थळावरून सुमारे १० लिटर मापाचा प्लास्टिक कॅन जप्त करण्यात आला आहे, ज्यात ९ लिटर गावठी दारू होती. या मुद्देमालाची एकूण किंमत ९५० रुपये इतकी आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३०/२०२६ नुसार महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. साळवी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ​दुसरी कारवाई: संगमेश्वर पावटा मैदान परिसरात धाड...​दुसरी कारवाई १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५-५५ वाजेच्या सुमारास संगमेश्वर येथील पावटा मैदानाच्या नदीकिनारी असलेल्या झाडी झुडपात करण्यात आली. या ठिकाणी संशयित अनंत सोमा जाधव (वय ५७ वर्षे, रा. माभळे-जाधववाडी) हा विनापरवाना गावठी दारू बाळगल्याप्रकरणी पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

टाईम्स स्पेशल

पोलीस शिपाई मृणाल चिंतामणी घोलप यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या ठिकाणाहून ८ लिटर गावठी दारू असलेला १० लिटरचा प्लास्टिक कॅन जप्त केला असून, याची किंमत ८७५ रुपये आहे. या कारवाईबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३१/२०२६ अंतर्गत नोंद करण्यात आली असून, पोहेकाँ व्ही. व्ही. मनवल या गुन्ह्याचा तपास करत आहेत. ​दोन्ही प्रकरणांतील आरोपींना बी.एन.एस ३५(३) प्रमाणे नोटीस बजावण्यात आली असून, पोलिसांनी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg