loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजात जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा

लांजा (सिराज नेवरेकर) - तालुक्यातील केळवली, वरचीवाडी येथे श्री देव धावबा बाकयजी सेवा संस्था वरचीवाडी यांच्यावतीने श्री देव धावबा बाकयजी यांच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा सोहळ्यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा हे मुख्य आकर्षण ठरणार आहे. शनि.दि.१८ एप्रिल रोजी सकाळी अभिषेकाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली असून सायंकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली. आज रवि.दि.१९ एप्रिल रोजी श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद (भंडारा)चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर रात्री जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा होणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ११,१११ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ९,९९९ रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ७,७७७ रुपये व सन्मानचिन्ह असे बक्षीस ठेवण्यात आले आहे. तसेच सहभागी संघांनाही मानधन व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन आमदार किरण सामंत यांच्या हस्ते होणार असून विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमासाठी परिसरातील भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सदर कार्यक्रम लांजा तालुक्यातील श्री धावबा बाकयजी मंदिर पटांगण, केळवली येथे पार पडणार आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg