loader
Breaking News
Breaking News
Foto

रुग्णवाहिकेवर तातडीने चालक नेमणूक केली नाही तर ठिय्या आंदोलनाचा बाबुराव धुरी यांचा इशारा

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील सर्वात जास्त रुग्ण संख्या असलेल्या साटेली भेडशी आरोग्य केंद्र येथील रुग्णवाहिकेवर तातडीने संबंधित संस्था यांनी चालक नियुक्ती केली नाही तर दोडामार्ग तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयसमोर ठाकरे सेनेच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

साटेली भेडशी आरोग्य केंद्र येथील रुग्णवाहिकेवर गरजेच्या वेळी चालक मिळत नाहीत यामुळे गंभीर आजारी रुग्ण यांना वाहन उपलब्ध होत नाही. यामुळे मोठी गैरसोय होते. या ठिकाणी इतर रुग्णवाहिका उपलब्ध नाहीत. तसेच दोडामार्ग येथील रुग्णवाहिकाही उपलब्ध होत नाही. साटेली भेडशी येथे कायमस्वरूपी १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करुन द्यावी, या मागणीकडेही दुर्लक्ष झालेले आहे. साटेली भेडशी आरोग्य केंद्र रुग्णवाहिकेवर तातडीने चालक नेमणूक करावी याबाबत बाबुराव धुरी यांनी तांडेल ग्लोबल यांना लेखी पञ दिले आहे. सोमवार २० एप्रिल पर्यंत चालक दिला नाही तर दोडामार्ग तालुका आरोग्य केंद्र येथे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा बाबुराव धुरी यांनी दिला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg