loader
Breaking News
Breaking News
Foto

कट्टा येथील राणे महाराज मठात विविध कार्यक्रमांचे आयोजन

मालवण (प्रतिनिधी) - कट्टा येथील प. पू राणे महाराज मठ, कुसरवेवाडी येथे रामनवमी आणि प. पू. श्री राणे महाराज दहाव्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त ६ व ७ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

६ रोजी रामनवमीनिमित्त सकाळी ९ वाजता मूर्तीअभिषेक, १० वाजता माजगाव येथील ह. भ. प. मधुरा मिलिंद सावंत यांचे रामजन्म कीर्तन, दुपारी १२ वाजता रामजन्म, १ वाजता महाआरती, १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४.३० वाजता स्थानिक भजने, ६ वाजता 'खेळ रंगला पैठणीचा', रात्री ८. वाजता समर्थ प्रासादिक भजन मंडळ, कट्टा. यांचे भजन. सोमवार, ७ रोजी स. ९. वा. महाराजांच्या पादुकांवर अभिषेक, १० वाजता नामदेव महाराज भक्तमंडळी, सिंधुदुर्ग यांचा हरिपाठ, दु १ वाजता महाआरती, १.३० वाजता महाप्रसाद, सायं. ४ वाजता कै. श्री. गुरुनाथ म्हाडगुत यांचे घर ते राणे महाराज मठ पालखी मिरवणूक, रात्री ८ वाजता दत्तमाऊली दशावतार लोककला नाट्यमंडळ, सिंधुदुर्ग यांचा 'मयुरेश्वर' नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg